President Message

Mahalle Patil Sanstha- Pinga Lakshidevi College

अमरावती जिल्ह्यातीतील  मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई तसे समृद्धच संतांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन

झालेल्या संत गुलाबपुरी महाराज, पिंगळादेवी च्या पायथ्याशी वसलेले या गावात गुरु गंगाधर स्वामी, ज्वालागिर

महाराज, सदाशिवनाथ महाराज, भोन्दुजी महाराज, उदाशी महाराज, शेख पिरबाबा, अश्या या पावन परिसरात उच्च

शिक्षणाच्या क्षेत्रात एका  विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा योग आला आहे.

त्या अनुभवातूनच ग्रामीण भागातील विद्यर्थ्यांना रोजगाराभिमुख व दर्जेदार शिक्षण देता यावे या हेतूने नेरपिंगळाई

येथे सन २०१६ साली पिंगळाक्षीदेवी महाविद्यालायाची स्थापना करण्यात आली. ६ वर्षाच्या अल्पावधीतच या

परिसरातील सुज्ञ पालक व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय करण्यात आली 

शिवाय इतर रोजगाराभिमुख उपक्रम महाविद्यालयात सातत्याने राबविण्यात येतात व त्याकरिता सतत मार्गदर्शन

 करण्यात येते.